वसई-विरार महानगरपालिकेतील लाचखोर लिपीक कह्यात !
ठाणे, ५ ऑगस्ट (वार्ता.) – तक्रारदाराला भूमी खरेदीसाठी लागणारा ना हरकत दाखला देण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागातील लिपीक शशिकांत किणी (वय ५४ वर्षे) यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ठरलेली ८ सहस्र रुपयांची लाचेची रक्कम घेतांना किणी यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांना कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी. – संपादक)