फुपणी (जिल्हा जळगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण !
उपस्थित मान्यवरांना सनातननिर्मित ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ हा ग्रंथ भेट !
जळगाव, ५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै या दिवशी फुपणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात डॉ. कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वडाचे रोप लावण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि सनातन-निर्मित ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर लोंकलकर आणि उपशिक्षक श्री. पंकज गरुड यांनी सत्कार केला. ‘ग्रंथ पुष्कळ उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे’, असा अभिप्राय पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सभापती सौ. ललिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रा. संजय पाटील, सरपंच यमुनाताई सपकाळे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शीतल कमलाकर पाटील, माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. पंकज गरुड यांनी, तर आभार श्री. नंदकिशोर लोंकलकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.