टाटा रुग्णालयात कर्करोगावर ‘प्रोटॉन’ उपचारपद्धतीची सुविधा !
विश्वातील १२० देशांमध्ये ही उपचारपद्धत उपलब्ध
नवी मुंबई – शरिरातील अन्य पेशींना इजा न करता केवळ कर्करोगाच्या पेशींवर उपचार करणारी ‘प्रोटॉन’ उपचारपद्धती खारघरमधील टाटा रुग्णालयामध्ये लवकरच चालू होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही उपचारपद्धती राबवण्यास (क्लिनिकल ट्रायलला) रुग्णालयाला संमती देण्यात आली आहे. देशात सरकारी संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारची अद्ययावत उपचारपद्धती चालू करणारी खारघरमधील टाटा ‘एक्ट्रेक्ट’ ही पहिलीच संस्था असल्याचे टाटा एक्ट्रेक्टचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.
एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी उपचारपद्धतीने उपचार देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जगातील केवळ १२० देशांमध्ये ही उपचारपद्धत उपलब्ध आहे.