मुंबईप्रमाणेच विश्वभरात पूरस्थिती निर्माण झाली असून तेथील महापालिका आमच्या नियंत्रणात नाहीत !

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात जुलै २०२१ मध्ये पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे मुंबईचीही पुष्कळ हानी झाली होती. यामुळे विरोधकांनी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘मुंबईप्रमाणेच विश्वभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील महापालिका आमच्या नियंत्रणात नाहीत’, अशा शब्दांत सुनावले. येथील एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘मुंबईवर नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा आणि काही मासांचा पाऊस काही घंट्यांत पडत आहे. पूरस्थिती केवळ मुंबईतच नव्हे, तर विश्वात निर्माण होते. त्याला उत्तरदायी कोण ?’’