कशी होऊ उतराई ।
साधकांवर चैतन्याचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
भारतमाता अन् संत यांच्या भूमीत जन्म दिल्यामुळे ।
सनातन संस्थेमध्ये आणून सुख-दुःखात स्थिर ठेवल्यामुळे ।
नेहमी आनंदी रहायला शिकवल्यामुळे ।
आणि मन-बुद्धी पलीकडच्या
पंचतत्त्वाच्या अनुभूती दिल्यामुळे ।
कशी होऊ मी उतराई ।। १ ।।
आध्यात्मिक त्रास असतांनाही
अंतर्मनातून साधना करवून घेतल्यामुळे ।
स्वभावदोष-अहं न्यून करवून घेतल्यामुळे ।
समष्टी साधना करतांना प्रेमभाव वाढवल्यामुळे ।
पात्रता नसतांना अनेक संतांचे दर्शन दिल्यामुळे ।
कशी होऊ मी उतराई ।। २ ।।
आपत्काळात भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून ।
सतत ईश्वरी अनुसंधानात ठेवल्यामुळे ।
झोपेतही साधना करवून घेतल्यामुळे ।
अखंड मानवजातीवर चैतन्य आणि ज्ञान
यांचा वर्षाव केल्यामुळे ।
सांग गुरुआई, कशी होऊ उतराई ।। ३ ।।
अनंत जन्माची पुण्याई; म्हणून लाभली गुरुआई ।
साधना आमुची याच जन्मी पूर्ण करूनी घेई ।
विलीन होऊ दे हा जीव तुझ्या चरणांशी ।
हीच प्रार्थना करते गुरुआई ।
कशी होऊ मी उतराई ।। ४ ।।
– सौ. जयश्री दहिसरकर, जागमाता, ठाणे. (१९.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |