कोरोनाच्या नियमांचे पालन करून मुंबईत ऑनलाईन गणेशोत्सव साजरा होणार !
मुंबई – मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत ‘ऑनलाईन’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणे टाळले होते. या वर्षी लालबागचा राजा, जीएसबी, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेशगल्ली आदी मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळांच्या पदाधिकार्यांनी दिली. या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ‘ऑनलाईन’ दर्शनावर भर देण्यात येणार आहे. विभागातून वर्गणी न घेणे, विसर्जन मिरवणूक रहित करणे असे महत्त्वाचे निर्णय अनेक मंडळानी घेतले आहेत.