एकमेकांना पूरक असलेली दुःखाची तीन प्रमुख कारणे आणि त्यांची उत्पत्ती
१. राग, द्वेष आणि भय – दुःखाची तीन प्रमुख कारणे आणि त्यांची उत्पत्ती
राग, द्वेष आणि भय ही दुःखाची तीन प्रमुख कारणे आहेत. जर त्यांच्यापासून दूर राहिलो, तर जीवनात कधीही दुःख होणार नाही. राग, द्वेष आणि भय या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असतात. रागातून द्वेषाची उत्पत्ती होते आणि द्वेषातून भयाचा जन्म होतो. आपण विचार करत असाल, ‘राग काय आहे ? त्यापासून द्वेषाची उत्पत्ती कशी होते ? भयाचा जन्म कसा होतो ?’
२. राग, द्वेष आणि भय यांची उत्पत्ती
अ. जर कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती यांच्याविषयी आसक्ती निर्माण होण्याच्या मागे त्यापासून मिळणार्या सुखाची अपेक्षा असेल, तर तो ‘राग’ आहे.
आ. जेव्हा अपेक्षेनुसार सुख मिळणे बंद होते, तेव्हा ‘द्वेष’ उत्पन्न होतो आणि द्वेषाने केले जाणारे कृत्य हे ‘भयाचे’ कारण बनते.
इ. बहुतेक वेळा लोक रागाला ‘प्रेम’ समजण्याची चूक करतात. प्रेम नेहमी निःस्वार्थी भावाने होते, तर ‘राग’ कुठल्यातरी सुखाच्या इच्छेतून उत्पन्न होतो. प्रेम ‘सात्त्विक’ भाव आहे, तर राग ‘राजसिक’भाव आहे !’
(संदर्भ : अज्ञात)