अनुसूचित जाती आणि जमातींतील व्यक्तीने धर्मांतर केल्यास तिला त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही ! – केंद्रशासन  

नवी देहली – अनुसूचित जाती आणि जमाती यांतील कुणीही धर्मांतर केल्यास त्याला अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही, असे केंद्रशासनाने संसदेत एक प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

केंद्रशासनाने म्हटले की, सरकारी योजनांचा उद्देश अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याण आणि विकास करणे, हा आहे. त्याचा लाभ धर्मांतरितांना देण्यात येऊ शकत नाही.

आंध्रप्रदेशात धर्मांतरितांनाही अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठीचे लाभ मिळणार !

आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी असल्यामुळेच अशा प्रकारचा आदेश काढून त्याची कार्यवाही होते ! निधर्मी भारताला हे लज्जास्पद ! – संपादक

भाग्यनगर – आंध्रप्रदेश सरकारकडून ३० जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील व्यक्तींना देण्यात येणारी सुविधा ख्रिस्ती आणि बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांनाही देण्यात येतील. आंध्रप्रदेश सरकारचा हा आदेश केंद्र सरकारच्या योजनांसाठी नसणार आहे.

आंध्रप्रदेशामध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारणारे ८० टक्के लोक अनुसूचित जाती आणि जमाती यांमधून येतात. (अशांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर केले असणार, हे लक्षात येते ! अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक)