बेळगाव (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन हिंदु मुलीची हत्या !
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
बेळगाव (कर्नाटक) – येथील हारूगेरी गावातील तेरदाळ-हारूगेरी मार्गावर अमीर जामदार या १९ वर्षांच्या तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. अमीर या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. पोलिसांनी अमीर याला अटक केली असून त्याची दुचाकीही जप्त केली आहे. विश्व हिंदु परिषद, रा.स्व. संघ, बजरंग दल, श्रीराम सेना आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुलीच्या घरापासून पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढत आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले. विश्व हिंदु परिषदेचे नेते विठ्ठल माळी म्हणाले की, आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील.
Belagavi: 19-year-old boy held for allegedly killing minor girl #Belagavi #MinorGirl https://t.co/yH6FCvGtnn
— The Hans India (@TheHansIndiaWeb) August 3, 2021