बजरंग दल सांगली जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मिरज, ३ ऑगस्ट (वार्ता.) – बजरंग दल सांगली जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूर रस्ता (बामणी), जुना धामणी रोड, उड्डाणपूल परिसर येथील शेतकरी आणि पूरग्रस्त यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.