व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्यांना येणार्या अनुभूती !
साधकांची भावजागृती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००४ मध्ये सांगितलेल्या ‘आता आपल्याला विज्ञापने मिळवण्यासाठी लोकांकडे जावे लागते; मात्र पुढे ‘मला तुमच्या अंकात विज्ञापन द्यायचे आहे’, असे सांगणारे लोक भेटतील’, या वचनाची आलेली प्रचीती !
‘एकदा मी महाबळेश्वर येथील एका साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना भ्रमणभाष करून त्यांना ‘अंक मिळतो का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुमचा अंक मिळतो. मला तुमच्या अंकात विज्ञापन द्यायचे आहे. तुम्ही इकडे आल्यावर मला अवश्य सांगा.’’ मी त्यांना होकार कळवला. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २००४ मध्ये सांगितलेले एक सूत्र आठवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले होते, ‘‘आता आपल्याला विज्ञापने मिळवण्यासाठी लोकांकडे जावे लागते; मात्र पुढे ‘मला तुमच्या अंकात विज्ञापन द्यायचे आहे’, असे सांगणारे लोक आपल्याला भेटतील.’’
त्या व्यक्तीने स्वतःहून विज्ञापन देण्याविषयी सांगितल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांचे ते शब्द ऐकू येत होते. त्या वेळी मला त्यांचे नयनमनोहरी मुखही दिसत होते. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
– सौ. नीला रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१.२०२१)
‘व्यष्टी साधना करणार्यांना व्यष्टी स्तरावरील, उदा. सूक्ष्म-गंध येणे, वलय दिसणे यांसारख्या अनुभूती येतात, तर समष्टी साधना करणार्यांना समष्टी स्तरावरील, उदा. कार्यात देवाचे साहाय्य होणे यांसारख्या अनुभूती येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |