बागलकोट (कर्नाटक) येथील कीर्तनकार पू. भस्मे महाराज ‘महंत भूषण’ पुरस्काराने सन्मानित !
बागलकोट (कर्नाटक) – येथील बनहट्टी गावातील ‘मनेयल्ली महामने सेवा समिती’ने तिला १२ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी संगनबसव महास्वामीजी, शांत भीष्म महास्वामीजी आणि बनहट्टीच्या महंत मंदार मठाचे महंत स्वामीजी उपस्थित होते. या वेळी रायपूर येथील कीर्तनकार पू. सदानंद भस्मे महाराज यांना ‘महंत भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी पू. सदानंद भस्मे महाराज यांच्याकडून प्रवचन करण्यात आले. तसेच त्यांचे पुत्र श्री. शिवानंद भस्मे यांचा संगीताचा कार्यक्रमही झाला.