वास्को (गोवा) येथील सौ. सुशांती मडगावकर यांना आलेल्या अनुभूती
१. श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होणे
‘२१.९.२०१७ या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस होता. त्या दिवशी मी पलंगावर पहुडले असतांना मला कमळात उभ्या असलेल्या (सनातन-निर्मित लक्ष्मीच्या चित्राप्रमाणे) श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले. ती जवळजवळ २ मिनिटे माझ्या डोळ्यांसमोर उभी होती.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘त्यांच्यातील क्षात्रतेज सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे
२४.९.२०१७ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ क्र. १० वर ‘फोंडा (गोवा) येथे २ दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’ला आरंभ’ या मथळ्याखाली वृत्त आणि छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या छायाचित्रातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिल्यावर ‘त्यांची दृष्टी साधकांना आध्यात्मिक ऊर्जा पुरवत आहे. त्यांच्यात क्षात्रभाव जागृत झाला असून त्यांच्यातील क्षात्रतेज सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. सुशांती मडगावकर, वास्को, गोवा. (२१.९.२०१७)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |