‘कलियुगी नाम हीच साधना’, संत ते वदले ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

सर्व साधकांच्या श्रद्धास्थानी असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

नामाचा आम्हा अलंकार तो दिधला ।
जीवनाचा आमुच्या अर्थच बदलून गेला ।। १ ।।

सत्संग, सेवा, प्रीती अंगीकारूनी ।
नामच वसले रोमरोमी ।। २ ।।

कैसी दिधली अमूल्य देणगी ।
साधक रंगले ‘सनातन’ रंगी ।। ३ ।।

नामामृत पिऊनी साधक ते तरले ।
‘नाम हाच खरा गुरु’ बाबा (टीप १) वदले ।। ४ ।।

नामाचे संरक्षककवच मिळाले ।
सद्गुरूंनी साधका चिलखत ते दिधले ।। ५ ।।

काया, वाचा, मन शुद्ध जाहले ।
नामाने साधक सात्त्विक ते बनले ।। ६ ।।

‘कलियुगी नाम हीच साधना’, संत ते वदले ।
स्वभावदोषरूपी षड्रिपूंना यमसदनी धाडिले ।। ७ ।।

सेवा करूया शरणागत होऊनी ।
क्षात्रभावही बाणवूया आपुल्या अंगी ।। ८ ।।

साधकहो, आता विश्राम(टीप २) नका करू कुणी ।
हीच अर्पूया ‘गुरुदक्षिणा’ नम्रभावे गुरुचरणी ।। ९ ।।

टीप १ : प.पू. भक्तराज महाराज

टीप २ : प्रत्येक क्षणी साधनारत रहाणे

– सौ. वसुधा विजय दवंडे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. (१७.४.२०२१)