तळीये (रायगड) येथील दुर्घटनेतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी जागेची निश्चिती
रायगड – तळीये (महाड) येथे अतीवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये ३५ घरे मातीखाली गाडली गेली होती. या घरांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती तळीये गावचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी दिली आहे. पुनर्वसनासाठी जागेच्या मालकांची संमती मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन तातडीने करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ही कार्यवाही जलदगतीने चालू केली आहे.