धर्मांध तांंत्रिकाकडून महिलेचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर
|
|
देहली – येथील शाहदरा भागात रहाणारी एक महिला आणि तिची भाची यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका धर्मांध तांत्रिकाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात दोन प्रथम माहिती अहवाल (एफ्आरआर्) नोंदवण्यात आले आहेत. धर्मांधाने महिलेचे धर्मांतर केले; मात्र भाचीने धर्मांतराला विरोध केल्याने तिचे धर्मांतर करण्यात त्याला अपयश आले.
Delhi: Two women accuse occultist Zakir of repeatedly raping them as minors and forcing them to convert to Islam https://t.co/MloT5eouh0
— OpIndia.com (@OpIndia_com) July 25, 2021
१. पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे वर्ष २००५ मध्ये ती १० वर्षांची होती. तेव्हा तिला झालेला एक आजार बरा करण्यासाठी ती झाकीर या तांंत्रिकाकडे गेली होती. तेव्हापासून त्याचे तिच्या घरी येणे-जाणे चालू झाले. पीडितेचे आई-वडील शिक्षक होते. पुढे आईचा मृत्यू झाला.
२. पीडिता १३ वर्षांची असतांना आरोपीने तिच्यावर प्रथम बलात्कार केला. तेव्हापासून आरोपी पीडितेचे लैंगिक शोषण करत आला आहे. या काळात आरोपीने पीडितेचा ४ वेळा गर्भपात करवला. त्याने पीडितेच्या अल्पवयीन भाचीलाही त्याच्या वासनेचे शिकार बनवले.
३. झाकीरने पीडित महिलेचे जन्मवर्ष १९९५ असतांना १९८५ असल्याचे दाखवून खोटे प्रतिज्ञापत्र बनवले. त्यानंतर तिच्याशी बलपूर्वक विवाह केला. तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यावर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली आणि त्यांचे मुसलमान पंथाप्रमाणे दफन केले.
४. शाहदरा पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही पीडितांच्या तक्रारींप्रमाणे २ प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आले आहेत. एका प्रकरणात पीडिता (पीडित महिलेची भाची) अल्पवयीन असल्याने त्यात ‘पॉक्सो’ कायदा लावण्यात आला आहे; तरीही आरोपीला अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला साहाय्य करण्यासाठी पोलिसांनी तक्रारीमध्ये जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केला, असा पीडितेने आरोप केला आहे. (पोलीस पीडितांना साहाय्य करण्याचे सोडून आरोपींना साहाय्य करत असल्यामुळेच समाजात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे जनतेला वाटल्यास आश्चर्य नाही ! – संपादक)
५. पीडितेच्या भाचीने सांगितले, ‘‘मी चौथीमध्ये असतांना झाकीरने माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने माझे सतत लैंगिक शोषण केले. वर्ष २०१७ पासून मी त्याला विरोध करणे चालू केले. त्यानंतर त्याने माझा शारीरिक छळ केला. पोलिसांकडे तक्रार नोंदवतांना माझे वय १६ वर्षे असतांना जाणीवपूर्वक ते २१ वर्षे नोंदवण्यात आले.’’ (अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)