सायरस पुनावाला यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित !
पुणे – कोविशिल्ड लसीचे निर्माते आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांना या वर्षीचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित झाला आहे. १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १३ ऑगस्ट या दिवशी टिळक महाराष्ट्र विद्यापिठामध्ये सकाळी साडेदहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशासाठी उल्लेखनीय कार्य करणार्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर : डॉ. दीपक टिळक https://t.co/C3zd92nIrY via @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) July 30, 2021
दळणवळण बंदीमुळे मागील वर्षी शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांना पुरस्कार प्रदान करता आला नाही. त्यामुळे काही कालावधीनंतर त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.