सातारा जिल्ह्यात ४ ठिकाणी अवैध मद्यसाठ्यांवर धाडी
अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईच करायला हवी !
सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा पोलिसांनी ४ ठिकाणी धाडी टाकून अवैध मद्यसाठा कह्यात घेतला आहे. या प्रकरणी ४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
१. म्हसवड पोलिसांनी माण तालुक्यातील हिंगणी या गावात घराजवळ मद्यविक्री करणार्या तातोबा सरतापे यांच्याकडून ९०० रुपयांचे १ लिटर मद्य कह्यात घेतले. (लहानलहान गावांमध्येही अवैध मद्यसाठा सापडणे, हे प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल ! – संपादक)
२. परळी येथे एका दुकानाच्या मागील बाजूस मद्यविक्री करणारे मनोज राऊत यांच्याकडून तालुका पोलिसांनी ८४० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या कह्यात घेतल्या.धाड
३. शहर पोलिसांनी पोलीस मुख्यालय ते शिवतीर्थ या रस्त्यावर मद्यविक्री करणारे महादेव शिंदे यांच्याकडून ५ सहस्र १०० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या कह्यात घेण्यात आल्या.
४. वडूज येथे विनोद अशोक जाधव यांच्याकडून ९३० रुपयांच्या १५ मद्याच्या बाटल्या पोलिसांनी कह्यात घेतल्या आहेत.