सप्तर्षींनी सांगिल्याप्रमाणे वर्ष २०२० आणि २०२१ च्या गुरुपौर्णिमेला पूजलेल्या चित्रांच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !
सूक्ष्मातील प्रयोग करण्यासाठी येथे क्लिक करा |
सूक्ष्मातील प्रयोगाचे उत्तर
१. सप्तर्षींनी सांगिल्याप्रमाणे वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला पूजलेल्या चित्राच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती
‘वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगिल्याप्रमाणे चित्र बनवून त्याचे पूजन रामनाथी आश्रमात करण्यात आले. त्या चित्राकडे बघून मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१ अ. चित्र बघितल्या बघितल्या पुष्कळ थंडावा, तसेच आनंद जाणवला.
१ आ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती. चित्र बघून लगेचच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
१ इ. माझ्या सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागली.
१ ई. चित्राचे वर्णन आणि त्याची लक्षात आलेली वैशिष्ट्ये : चित्रामध्ये मध्यभागी गोलात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र आहे. त्यांच्या वर डाव्या बाजूला श्रीकृष्ण आणि उजव्या बाजूला श्रीराम हे आहेत. भूमीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (डावीकडे) आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडे) हात जोडून बसल्या आहेत आणि त्यांची दृष्टी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे असून त्या त्यांना प्रार्थना करत आहेत.
१ ई १. चित्राकडे बघणे
अ. या चित्राकडे बघितल्या-बघितल्याच माझी दृष्टी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडेच आकर्षित झाली.
आ. ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी त्यांचे तत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये पूर्णतः कार्यरत केले आहे’, असे जाणवले. त्यामुळे त्या देवतांकडे दृष्टी न जाता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडेच दृष्टी आकर्षित झाली.
इ. चित्रातून पुष्कळ प्रमाणात ऊर्जा मिळली. ‘ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठी आपण पूर्णपणे भारित झालो आहोत’, असे वाटले.
ई. ‘ईश्वरी राज्याची पहाट आता लवकरच बघायला मिळणार’, या विचाराने मन पुष्कळ आनंदित झाले.
उ. उत्साह वाटला. या चित्राकडे बघतच रहावेसे वाटले.
१ ई २. चित्राला स्पर्श करणे
अ. चित्रातील श्रीकृष्ण आणि श्रीराम असलेल्या भागाला स्पर्श करणे : चांगली शक्ती जाणवली आणि सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. देवता ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ पुरवत असल्याने शक्तीची स्पंदने जाणवली.
आ. चित्रातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बसलेल्या भागाला स्पर्श करणे : चांगली शक्ती जाणवली; पण ती शक्ती पुष्कळ अधिक प्रमाणात होती. माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष कार्य करत असल्याने अधिक प्रमाणात शक्ती जाणवली.
इ. चित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले असलेल्या भागाला स्पर्श करणे : पुष्कळ थंडावा जाणवला. पोकळी जाणवली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुरुतत्त्व मार्गदर्शनाच्या स्तरावर कार्यरत असल्याने आणि ते निर्गुण स्तरावर अधिक असल्यामुळे थंडावा आणि पोकळी जाणवली.
संपूर्ण चित्र एकत्रितरित्या चैतन्याच्या स्तरावर कार्यरत असल्याने चित्राला कुठेही स्पर्श केला, तरी सुषुम्ना नाडी कार्यरत होते.
१ उ. चित्रातून प्रक्षेपित होत असलेली स्पंदने
२. वर्ष २०२० मध्ये गुरुपौर्णिमेला पूजलेल्या आणि या वर्षी पूजलेल्या चित्रांमध्ये जाणवलेले भेद
मागील वर्षी (वर्ष २०२० मध्ये) गुरुपौर्णिमेसाठी सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीकृष्णाच्या रूपात कुरुक्षेत्रावर (रणांगणात) असून त्यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी त्यांना अर्जुनासारख्या प्रार्थना करत आहेत अन् श्रीकृष्णरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले हे त्यांना आशीर्वाद देत आहेत’, असे चित्र बनवले होते.
या दोन्ही चित्रांवरून लक्षात येते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, देवता आणि सप्तर्षि यांच्या कृपेने साधक ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी करत असलेल्या संघर्षामध्ये त्यांची वाटचाल प्रतिवर्षी कशी विजयाच्या दिशेने होत आहे !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२१)
|