चीनला कोरोनाचा ‘सुपर स्प्रेडर’ म्हटल्याने भारतीय मासिकावर चीनमध्ये बंदी !
|
बीजिंग – चीनला कोरोनाचा ‘सुपर स्प्रेडर’ (मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवणारा) म्हटल्याने चीनने भारतातील ‘स्वराज्य’ या मासिकावर चीनमध्ये बंदी घातली. अनेक जागतिक शास्त्रज्ञांच्या मते कोरोना विषाणूची उत्पत्ती ही चीनच्या वुहानमधील प्रसिद्ध प्रयोगशाळेतूनच झाली आहे.
भारतातील ‘स्वराज्य’ हे राष्ट्रवाद जपणारे मासिक आहे. त्यात राजकारण, संरक्षण, अर्थकारण, भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवरील बातम्यांचा समावेश असतो. या मासिकात ‘मुखपृष्ठ कथा’ म्हणून ‘सुपरस्प्रेडर चीनला मिळाले संरक्षण, जागतिक आरोग्य संघटनेशी होते संगनमत, जगाला समजण्याआधी मानवता आली धोक्यात !’, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुखपृष्ठावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे छायाचित्रही छापले आहे. चीनने या वृत्तावर आक्षेप घेत सदर मासिकावरच चीनमध्ये बंदी घातली.