कोरोनाच्या काळात काम करूनही राज्यातील ४२ सहस्र होमगार्डना मानधन नाही
जनतेच्या सुरक्षेसाठी झटणार्यांना वेळेत मानधन दिले न जाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
मुंबई – दळणवळण बंदीमध्ये बंदोबस्तासाठी पोलिसांना होमगार्डचे (गृहरक्षक दलात कार्यरत असलेले) मोठ्या प्रमाणात साहाय्य झाले. या काळात दिवस-रात्र बंदोबस्ताला असूनही ४२ सहस्र होमगार्डना एप्रिल ते जुलै या ४ मासांचे मानधन देण्यात आलेले नाही.
महासमादेशक कार्यालयाकडे होमगार्डना मानधन देण्यासाठी निधी शिल्लक नसल्याचे आढळून आले आहे. २ वर्षांपूर्वी होमगार्डच्या मानधनात वाढ करण्यात आली होती; परंतु त्यांना देण्यासाठी लागणार्या पैशांची तरतूद वार्षिक अंदाजपत्रकात करण्यात आली नव्हती. त्यामुळे सध्या महासमादेशक कार्यालयाकडे निधीचा तुटवडा आहे.