गोवा मुक्तीच्या षष्ट्यब्दिपूर्ती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट ते १९ डिसेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ३० जुलै (वार्ता.) – गोवा मुक्तीच्या षष्ट्यब्दिपूर्ती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट ते १९ डिसेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘श्री गणेशचतुर्थीनंतर ‘हेल्थ फॉर ऑल’ (सर्वांना चांगले आरोग्य लाभावे) या मोहिमेच्या अंतर्गत कोरोनाबाधित कोरोनापासून बरे झाल्यानंतर उद्भवणार्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेच्या अंतर्गत पंचसदस्यांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने मार्गदर्शन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेच्या अंतर्गत पंचायत सदस्यांना लवकरच ‘व्हर्च्युअली’ (ऑनलाईन) मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेची प्रशंसा केली आहे.