५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्चस्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मैसुरू (कर्नाटक) येथील चि. ऋशंक राघवेंद्र (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ऋशंक राघवेंद्र हा एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आषाढ कृष्ण पक्ष अष्टमी (३१.७.२०२१) या दिवशी मैसुरू (कर्नाटक) येथील चि. ऋशंक राघवेंद्र याचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी आलेली अनुभूती आणि त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. चि. ऋशंक मैसुरू येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. राधा मंजुनाथ यांचा नातू आहे.

चि. ऋशंक राघवेंद्र

चि. ऋशंक राघवेंद्र याला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !  

१. जन्मापूर्वी

१ अ. ‘गर्भधारणा झाल्यापासून मी प्रतिदिन गणपति स्तोत्राचे पठण करायचे. मी प्रतिदिन सायंकाळी रामरक्षास्तोत्र ऐकून रामाचे स्मरण करायचे.

१ आ. अनुभूती – गर्भारपणात मी शिवाचे चित्र रेखाटले होते. त्या वेळी चित्र रेखाटतांना मला आदियोगी (शिव) आणि आदिशक्ती यांचे आशीर्वाद मिळाल्याचे जाणवले.

सौ. रेणुका राघवेंद्र

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ११ मास : चि. ऋशंक सहा मासांचा असल्यापासून भक्तीगीते एकाग्रतेने ऐकतो. घरी पूजेच्या वेळी आरती करत असतांना तो त्यात सहभागी होतो. आरती झाल्यानंतर तो आरती घेण्यासाठी पुढे येतो.’

– सौ. रेणुका राघवेंद्र (आई), मैसुरू, कर्नाटक.

२ आ. वय १ ते दीड वर्षे

२ आ १. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा : ‘घरी सुखासनावरील आसने विस्कटलेली असल्यास तो ती व्यवस्थित करतो. खिडकीवर धूळ दिसल्यास तो ती लगेच पुसतो.

२ आ २. धर्माचरण करणे

अ. त्याला प्रतिदिन टिळा लावायला आवडते. तो स्वतः त्याला टिळा लावायला सांगतो.

आ. ऋशंकला खाली बसून आणि सर्वांच्या समवेत जेवायला आवडते.’

– सौ. राधा मंजुनाथ (आजी (वडिलांची आई)), मैसुरू

२ आ ३. सात्त्विकतेची ओढ

२ आ ३ अ. मांसाहार न आवडणे : ‘ऋशंकला मांसाहार आवडत नाही.

२ आ ३ आ. सात्त्विक गोष्टींची आवड : घराच्या अंगणातील रांगोळी पाहून त्याला आनंद होतो. खेळत असतांनाही तो रांगोळीवर पाय पडू देत नाही. एखाद्या वेळी सकाळी रांगोळी काढायला उशीर झाल्यास तो ‘आजी, आज रांगोळी काढली नाही’, असे म्हणून आठवण करून देतो.

२ आ ३ इ. गायींना पाहिल्यावर ऋशंकला आनंद होतो. तो गायींना नमस्कार करतो. त्यांना चारा भरवतांना तो घाबरत नाही.’

– सौ. रेणुका राघवेंद्र आणि सौ. राधा मंजुनाथ

२ आ ४. देवाची ओढ

अ. ‘ऋशंकला श्री गणपति आणि दत्त पुष्कळ आवडतात. आमच्या घराच्या दारावर गणपतीचे चित्र कोरलेले आहे. ते पाहून तो येता-जाता त्याला नमस्कार करतो. तिथे ‘आरती करत आहे’, असा भाव ठेवून आरती करतो. आम्ही घरातील भिंतींवर देवतांची चित्रे लावली आहेत. तो त्या चित्रांकडे पाहून नमस्कार करतो.

आ. सनातन-निर्मित अष्टदेवतांच्या चित्रांमधील देवतांची नावे विचारल्यावर तो बरोबर त्याच देवतेचे चित्र दाखवतो. याविषयी आम्ही कोणी त्याला सांगितलेले नाही, तरी तो देवतांची चित्रे ओळखतो. याचे आम्हाला आश्चर्य वाटते.

इ. तो ‘जय हनुमानजी, जय जय ।’, असा जयजयकार करतो.’

– सौ. राधा मंजुनाथ

ई. ‘एकदा मी ऋशंकला ‘व्हिडिओ कॉल’ केला होता. त्या वेळी मी त्याला आमच्या घरी असलेले श्रीकृष्णाचे चित्र दाखवले. तेव्हा त्याने लगेच हात जोडून भावपूर्ण नमस्कार केला आणि तो ‘वासुदेव, वासुदेव’, असे म्हणाला. (तो श्रीकृष्णाला ‘वासुदेव’ म्हणतो)

२ आ ५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीची ओढ : ऋशंकशी भ्रमणभाषवर बोलतांना मी त्याला म्हणाले, ‘‘तू गोव्याला येणार का ?’’ त्यावर तो काही बोलला नाही. नंतर मी त्याला म्हणाले, ‘‘इकडे मोठे आजोबा आहेत. (तो परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मोठे आजोबा’ म्हणतो) तू येणार का ?’’ तेव्हा तो लगेच ‘येणार’, असे म्हणाला. नंतर मी त्याला म्हणाले, ‘‘इकडे वासुदेव आहे. तू येणार का ?’’ तेव्हाही तो लगेच ‘येणार’, असे म्हणाला. त्या वेळी ‘प्रत्येक सात्त्विक जीव गुरुदेवांकडे आपोआप आकर्षित होतो’, असे जाणवून माझा भाव जागृत झाला.

२ आ ६. ऋशंकशी बोलतांना मला आनंद जाणवतो. तो काही बोलला नाही, तरी त्याच्या कृतींकडे पाहून मला चांगले वाटते.’

– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (मावस आत्या (वडिलांची मावस बहीण))

३. वरील लिखाणाच्या समवेत देण्यासाठी चि. ऋशंकचे छायाचित्र काढतांना झालेले त्रास

ऋशंकने छायाचित्र काढू न देणे आणि विनाकारण रडणे अन् त्या वेळी घरी सर्वांची चिडचिड होणे : ‘ऋशंकचे छायाचित्र काढण्यासाठी त्याला सात्त्विक कपडे घालून टिळा लावून त्याची सिद्धता केली; पण तो छायाचित्र काढतांना पुष्कळ त्रास देऊ लागला. तो छायाचित्र काढू देत नव्हता. तो सकाळपासून दुपारपर्यंत काही कारण नसतांना रडत होता. ‘तो असे का करत आहे ?’, हे घरात कुणाच्याही लक्षात येत नव्हते. त्या वेळी घरी सर्वांची चिडचिड झाली.

४. ऋशंकमधील स्वभावदोष : हट्टीपणा

५. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, ‘तुमच्या कृपेनेच मला ऋशंकची गुणवैशिष्ट्ये लिहिता आली’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. राधा मंजुनाथ (२७.६.२०२१)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.