राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण ! !
केंद्रशासनाचा निर्णय !
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ १० वर्षेच आरक्षण देणे अपेक्षित होते, हे येथे लक्षात घ्यायला हवे !
नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतही केंद्रीय कोट्यांतर्गत राखीव १५ टक्के जागांवर ओबीसींना २७ टक्के, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
Our Government has taken a landmark decision for providing 27% reservation for OBCs and 10% reservation for Economically Weaker Section in the All India Quota Scheme for undergraduate and postgraduate medical/dental courses from the current academic year. https://t.co/gv2EygCZ7N
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2021
केंद्रशासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे आरक्षण आधीपासूनच लागू आहे. आजवर राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केंद्रीय कोट्यांतर्गत केवळ अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांनाच आरक्षण मिळत होते.
अखिल भारतीय कोटा योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीयांना 27 टक्के आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. https://t.co/viMGqa36FW
— Saamana (@SaamanaOnline) July 29, 2021