घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव
‘प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/498776.html
उ. कर्मचार्यांनी ‘दीड लाख रुपये आगाऊ (डिपॉझिट) भरा, म्हणजे उपचार चालू करू’, असे सांगणे : आम्ही दुसर्या रुग्णालयात गेल्यानंतर तेथील कर्मचार्यांनी ‘दीड लाख रुपये आगाऊ (डिपॉझिट) भरा, म्हणजे उपचार चालू करू’, असे सांगितले. त्यानुसार आम्ही पैसे गोळा करून ते भरले.
ऊ. कोरोना चाचणी होईपर्यंत कोरोना रुग्ण विभागात; परंतु कोरोना रुग्णांपासून वेगळे ठेवणे आणि तिसर्या दिवशी कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) आल्यानंतर वेगळ्या ठिकाणी ठेवणे : रुग्णालयात भरती केल्यानंतर तेथील आधुनिक वैद्यांनी ‘रुग्णाची कोरोना चाचणी होत नाही, तोपर्यंत त्यांना कोरोना रुग्ण विभागात (वॉर्डमध्ये) ठेवावे लागेल’, असे सांगितले. त्या चाचणीचा अहवाल यायला २ दिवस लागतात. प्रथम मला कोरोना ‘वॉर्ड’मध्येच तेथील रुग्णांपासून वेगळे ठेवले. माझा मुलगा विजय याने धावपळ करून मला कोरोना रुग्ण नसलेल्या वॉर्डमध्ये ठेवण्याचे प्रयत्न केले. माझी कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) आल्यानंतर तिसर्या दिवशी मला कोरोना रुग्ण नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/499599.html
– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर, मुंबई.