ऑस्ट्रेलिया भारताच्या १४ मौल्यवान आणि प्राचीन कलाकृती परत करणार !
या प्राचीन कलाकृती ऑस्ट्रेलियात कशा गेल्या ? भारताच्या प्राचीन कलाकृतींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असतांना पुरातत्व विभाग झोपा काढत होता का ? असा विभाग विसर्जित करा !
सिडनी (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलिया त्याच्या राष्ट्रीय कला संग्रहालयात असलेल्या भारताच्या १४ मौल्यवान प्राचीन कलाकृती भारताला परत करणार आहे. या वस्तूत मूर्ती, चित्रे, छायाचित्रे आदींचा समावेश असून यांतील अनेक कलाकृती १२ व्या शतकातील आहेत. त्याची किंमत १६ कोटी रुपये असल्याचे समजते. वर्ष १९८९ ते २००९ या काळात या कलाकृती या संग्रहालयात सामील केल्या गेल्या होत्या. दुर्मिळ वस्तूंची तस्करी करणार्या सुभाष कपूर याच्याकडून यांतील १३ मिळवण्यात आल्या आहेत. सुभाष कपूर सध्या कारागृहात आहे. यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये या संग्रहालयाने २७ कोटी रुपये किमतीची अतिशय दुर्मिळ अशी पितळीची शिव मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवली होती.
Australia to return 14 stolen artworks to India including sculptures, photographs, scrollhttps://t.co/2XwDzyj5FF
— DNA (@dna) July 29, 2021