मुंबई पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या संगमनेरमधील (नगर) घरावर ईडीची धाड
१०० कोटी रुपये वसुलीचे प्रकरण
नगर (संगमनेर) – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील उपायुक्त पदावर असलेले राजू भुजबळ यांचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील राजू भुजबळ यांच्या शेतातील घरावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका पथकाने धाड टाकली.
शंभर कोटींच्या आरोपांची चौकशी, ED चे पथक संगमनेरमधील फार्महाउसवरhttps://t.co/UCnvUviu42 #Anildeshmukh #ED #parambirsingh #ahmednagar
— Maharashtra Times (@mataonline) July 28, 2021
१. पथकाने भुजबळ यांच्या नातेवाइकांकडे चौकशी केली; मात्र यामध्ये पथकाच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईसंबंधी अधिकृतपणे पोलीस किंवा ईडीकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
२. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या मुंबईतील सरकारी निवासस्थानी सचिन वाझे यांच्यासह पोलीस उपायुक्त राजू भुजबळही उपस्थित असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या मूळ गावाची माहिती मिळाल्यानंतर हे पथक येथे आले होते.
३. परमबीर सिंह यांनी आरोपादाखल उपायुक्त भुजबळ आणि साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या ‘व्हॉट्सॲप’ संभाषणाचे दाखले दिले होते; मात्र चौकशीत दोघांनी ते आरोप फेटाळले आहेत.