गोव्यासह ५ राज्यांची निवडणूक फेरआढावा बैठक
पणजी – गोव्यासह ५ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांची फेरआढावा बैठक घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे निवडणुकीशी संबंधित पुढील नियोजनाविषयी चर्चा केली. या बैठकीमध्ये गोव्याव्यतिरिक्त मणीपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांचा समावेश होता.