भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ‘मदतफेरी’द्वारे पूरग्रस्तांसाठी गोळा केले साहाय्य !
बीड – राज्यातील विविध भागांत नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे पूरस्थितीचे मोठे संकट आले आहे. सध्या तरी याचा विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे पूरग्रस्त भागांत जाण्याऐवजी तेथे साहाय्य पोचवणार आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले. भाजपच्या वतीने शहरात २९ जुलै या दिवशी पूरग्रस्तांसाठी ‘मदतफेरी’चे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, पूर आलेल्या ठिकाणी परिस्थिती पुष्कळ गंभीर आहे. काही गावे मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. अशा परिस्थितीत तेथील लोकांना साहाय्य मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्या ठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. मी माझे साहाय्य तेथे पाठवेन.