सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे जाणवलेले गुणवैशिष्ट्य आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

१. गुणवैशिष्ट्य

कितीही व्यस्तता असली, तरी दूरभाषवर नामजप सांगणे : ‘मला त्रास होत असतांना नामजप विचारण्यासाठी कधी सद्गुरु राजेंद्रदादांना दूरभाष केला आणि ते कितीही व्यस्त असले, तरी दूरभाष उचलतात आणि नामजप सांगतात. ‘त्यांनी दूरभाष उचलला नाही’, असे कधी झाले नाही.

२. आलेल्या अनुभूती 

२ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या छायाचित्राशी बोलल्यावर त्रास उणावून मनाला उभारी मिळणे : सद्गुरु राजेंद्रदादा दक्षिण भारतात आले होते. तेव्हापासून मी साधनेत आले. जेव्हा मला त्रास होतो, तेव्हा मी माझ्या भ्रमणभाषमध्ये असलेल्या सद्गुरु दादांच्या छायाचित्राशी बोलत रहाते. त्यांना माझ्या मनातील नकारात्मक विचार आणि होत असलेला त्रास सांगितल्यावर माझा त्रास उणावतो अन् मनाला उभारी मिळते.

२ आ. सद्गुरु राजेंद्रदादांचे हास्य ऐकून लाभ होणे आणि मरगळ निघून जाऊन साधनेला उत्साह मिळणे : दूरभाषवरील त्यांचे हास्य ऐकून माझा सगळा त्रास न्यून होतो आणि उत्साह वाढतो. सगळी मरगळ निघून जाते. या सर्वांतून त्यांची प्रीती लक्षात येते. माझी साधना त्यांच्यामुळेच चालू आहे. त्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता वाटते.

‘हे भगवंता, ‘आम्हाला असे सद्गुरु मिळाले’, यासाठी आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– सौ. मीना कदम, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) विशाखापट्टणम् (डिसेंबर २०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक