सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती

‘२८.१२.२०१९ या दिवशी दोन साधिकांना पुष्कळ त्रास होत होता. मी सांगितलेले त्या स्वीकारत नव्हत्या. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादांना (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना) भ्रमणभाषवरून हा प्रसंग सांगून नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी तीन घंटे नामजप करण्यास सांगितला. त्यांमधील एक घंटा आम्ही सामूहिक नामजप केला. या एक घंट्यात आम्हाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

१. मला तुळशीचा सुगंध येत होता.

२. मनात एकही विचार न येता नामजप भावपूर्ण होणे : 

एका साधिकेने सांगितले, ‘‘एरव्ही माझ्या मनात पुष्कळ विचार येतात; पण या वेळी एकही विचार मनात आला नाही.’’ आमचा नामजप भावपूर्ण झाला.

३. सर्वांना गारवा जाणवत होता.

४. सूक्ष्मातून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे अस्तित्व जाणवणे :

या एक घंट्यात सर्वांनाच ‘आमच्यासमोर सद्गुरु राजेंद्रदादा बसून नामजपादी उपाय करत आहेत’, असे वाटले. त्या वेळी आम्हाला सूक्ष्मातून त्यांचे अस्तित्व जाणवत होते. थोड्या वेळाने तेथे बालसाधक नामजपासाठी आले होते. त्या सर्वांना वरील विषय ठाऊक नव्हता, तरीही ‘त्यांना सद्गुरु दादांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती’, असे बालसाधकांनी सांगितले.

५. नामजप केल्यानंतर सगळ्यांची स्थिती सकारात्मक झाली आणि सेवेचा उत्साह वाढला.’

– सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), विशाखापट्टणम् (डिसेंबर २०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक