अधिकाधिक हानीभरपाई मिळण्यासाठी संघर्ष करू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
भिलवडी (जिल्हा सांगली), २९ जुलै (वार्ता.) – वर्ष २०१९ मध्ये आमचे सरकार असतांना आम्ही निकषापलीकडे जाऊन साहाय्य केले. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदाची हानी अधिक आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक हानीभरपाई मिळण्यासाठी संघर्ष करू, अशी चेतावणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधल्यावर त्यांनी ही चेतावणी दिली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘कृष्णाकाठच्या गावांना होणारा पुराचा धोका कायमचा संपवायचा असेल, तर ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ योजना पूर्ण करण्याविना पर्याय नाही, तसेच वडणेरे समितीच्या शिफारसींची सरकारने कार्यवाही करावी.’’