ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित !

आशा भोसले

मुंबई – राज्यशासनाचा वर्ष २०२१ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना घोषित करण्यात आला आहे. २९ जुलै या दिवशी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भोसले यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. या वेळी अमित देशमुख यांनी आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचा ‘लोकराज्य’ हा अंक त्यांना भेट दिला.