पाकमध्ये बकरीवर ५ जणांकडून लैंगिक अत्याचार करून तिची हत्या !
|
ओकारा (पाकिस्तान) – येथे ५ जणांनी बकरी चोरून तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बकरीच्या मालकाने बकरीचा शोध घेतला असता ती मृतावस्थेत जंगलात सापडली. त्याने पशूवैद्यांकडे तिला नेल्यावर तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार केली. ५ पैकी नईम, नदीप आणि रब नवाज अशा तिघांची नावे समोर आली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Pakistan: Five men booked for abducting, gang-raping and killing a goat https://t.co/ZX5FnlJy2X
— OpIndia.com (@OpIndia_com) July 29, 2021
सामाजिक माध्यमांतून पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर प्रखर टीका !
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘अश्लीलतेमुळे लैंगिक अत्याचार होतात आणि ही अश्लीलता पाश्चात्त्य देशांतून आणि भारतातून आली आहे. पुरुष रोबोट नाहीत. जर महिला तोकडे कपडे घालतील, तर त्याचे परिणाम तर दिसणारच’, असे विधान केले होते. आता बकरीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सामाजिक माध्यमांतून इम्रान खान यांच्यावर टीका होऊ लागली आहे. पाकचे क्रिकेटपटू वासीम अक्रम यांची पत्नी शानिएरा अक्रम यांनी म्हटले, ‘आज बकरी उद्या कोण असणार ? आरोपी म्हणतील की, बकरीची चूक आहे. ती एकटी का होती आणि तिने तिचे अंग का झाकले नव्हते ?’
ट्विटरवर काही जणांनी ट्वीट करून इम्रान खान यांना ‘टॅग’ (संबंधितांना उद्देशून लिहिणे) केले आहे. त्यात त्यांनी विचारले आहे की, आता बकर्यांनाही बुरखा घालावा लागणार आहे का ? त्यामुळे ‘रोबोट’ (वासनांध पुरुष) असणार्यांवर नियंत्रण राहील.