परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री. नीलेश पाध्ये यांच्यात जाणवलेले पालट !
‘आम्ही ३ वर्षे पुण्याला रहात होतो. तेव्हा मला वाटायचे, ‘आपल्याला पुन्हा गोव्याला यायला मिळणार नाही’; पण एका संतांनीच श्री. नीलेश पाध्ये यांना गोव्याला यायला सांगितले आणि त्यांनी तसा निर्णय घेतला. तेव्हा ‘देवच त्यांना आतून पालटत आहे’, असे वाटले; कारण मी सांगून ते ऐकायचे नाहीत. त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहे.
१. सकारात्मकता वाढणे
पूर्वी एखादा प्रसंग घडल्यावर ते टोकाची भूमिका घेत असत; परंतु आता ‘प्रसंगातून देव शिकवत आहे’, हा भाग वाढल्यामुळे त्यांची सकारात्मकता वाढली आहे.
२. उपायांचे गांभीर्य वाढणे
माझे सासरे श्री. सुधाकर पाध्ये यांना अनिष्ट शक्तींचा त्रास होतो. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी प्रत्येक अर्ध्या घंट्याने त्यांच्यावरील आवरण काढायला सांगितले होते. त्यांना जमले नाही, तर श्री. नीलेश यांना आवरण काढायला सांगितले होते. श्री. नीलेश यांनी आवरण काढल्यावर बाबांचा त्रास न्यून होत असे. तेव्हापासून त्यांचे उपायांचे गांभीर्य पुष्कळ वाढले आहे.
३. संयम आणि इतरांना साहाय्य करणे
आता ते घरातील प्रसंग संयमाने आणि शांतपणे हाताळतात. पूर्वीच्या तुलनेत त्यांचा साहाय्य करण्याचा भाग वाढला आहे. त्यामुळे त्यांचा आधार वाटतो. सासर्यांची प्रकृती २ मास बरी नव्हती. त्यामुळे त्यांच्या समवेत २४ घंटे रहावे लागत होते. त्या परिस्थितीतही ते शांत आणि देवाच्या अनुसंधानात होते.
४. आता त्यांची चिडचिड पुष्कळ न्यून झाली आहे.
५. भावजागृतीचे प्रयत्न करून मनातील नकारात्मक विचारांवर मात करणे
गोव्यात आल्यावर श्री. नीलेश यांच्या मनात नकारात्मक विचार येत होते; पण त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न करून त्यांवर मात केली. ‘परात्पर गुरु डॉक्टर मला सांभाळणार आहेत आणि माझ्या विचारांत तेच पालट करून घेणार आहेत’, असे ते नेहमी म्हणतात. आता त्यांच्या तोंडवळ्यावर भाव जाणवतो.
६. पूजा आणि नामजप भावपूर्ण करणे
ते प्रतिदिन घरातील पूजा भावपूर्ण करतात. पूजा करतांना उपायांसाठीचा नामजप भावपूर्ण करतात. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर वेगळा पालट जाणवतो.
७. ‘नामजप, सांगितलेले मंत्र आणि स्तोत्रे म्हणणे’, यांमुळे त्यांच्या व्यष्टी साधनेतील सातत्य वाढले आहे.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राशी बोलणे
ते प्रतिदिन नामजप आणि स्तोत्रे ऐकत काम करतात. त्यांच्या संगणकाच्या पडद्यावर (‘डेस्कटॉप’वर) परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आहे. त्या छायाचित्राशी ते नेहमी बोलतात. त्यामुळे ते छायाचित्र सजीव वाटते.
९. भाव
त्यांच्याकडे एक छोटीशी गदा आहे. काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी ती हातात घेतली होती; म्हणून त्या गदेविषयी त्यांच्या मनात भाव निर्माण झाला आहे. त्या गदेला सुगंध येत आहे.
१०. ‘त्यांची अंतर्मनाची साधना चालू आहे’, असे जाणवते.’
– सौ. जानकी पाध्ये (पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२०)