अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हिंगोली येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचे निलंबन !

पोलीस उपनिरीक्षकांच्या आदेशानुसार कारवाई !

अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !

प्रतिकात्मक छायाचित्र

हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात चालू असलेल्या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी येथील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी २६ जुलै या दिवशी ही कारवाई केली.

आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत शेवाळा शिवारात अवैध व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयास मिळाली होती. त्यावरून साहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने २५ जुलैच्या सायंकाळी धाड टाकून ४ लाख ८७ सहस्र रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी ७ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.