सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे २४ घंट्यामध्ये २६ जणांचा मृत्यू !
सातारा, २८ जुलै (वार्ता.) – राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे; मात्र सातारा जिल्ह्यात ८०० च्या टप्प्यात चालू असलेली कोरोनाबाधितांची साखळी तुटत नाही. २४ घंट्यामध्ये जिल्ह्यातील ८७४ नागरिक कोरोनाबाधित झाले असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
कराड येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक असून पाठोपाठ सातारा आणि फलटण तालुक्यातही कोरोनाबाधित अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, तर सर्वात अल्प बाधित महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहेत. मृतांमध्येही कराड, सातारा आणि फलटण या तालुक्यांमध्येच अधिक संख्या आहे.