कोरोना झाल्यावर मुलींकडून साहाय्याची अपेक्षा न करता स्थिर राहून प्रसंगाला सामोरे जाणारे श्री. दत्तात्रय कुलकर्णी !
‘फेब्रुवारी २०२१ मध्ये आम्ही बहिणी कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे जाणार होतो. त्या वेळी बाबांचेही तेथे यायचे ठरले होते. तेथे जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांना कणकण होती, तरीही आमचा हिरमोड व्हायला नको; म्हणून ते कणकण असतांनाही आमच्या समवेत कणकवलीला आले. तिथे गेल्यावर त्यांना ताप आला. त्यामुळे ते झोपून होते. नंतर सांगलीला परतल्यावर त्यांनी औषधे घेतली, तसेच कोरोनाची चाचणी केली. त्या वेळी आईची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली. बाबांनाही कोरोनाची लक्षणे होती. त्यांना बरेच त्रास होत होते. त्यांना दम लागत होता. त्या वेळी आम्हा बहिणींची कोरोना चाचणीही ‘पॉझिटिव्ह’ आली होती. तिसरी बहीण दूर रहात असल्याने ती आई-बाबांकडे येऊ शकत नव्हती. आम्ही कुणीही जवळ नसतांना ते दोघे १४ दिवस विलगीकरणात राहिले. त्यांनी स्वतःच चिकित्सालयात जाऊन औषधोपचार घेतले. आधुनिक वैद्यांनी बाबांना सांगितले, ‘‘तुम्हालाही कोरोना होऊन गेला असणार; पण आता तुम्ही त्यातून बाहेर पडला आहात.’’ त्या वेळी गुरुकृपेनेच त्यांचे रक्षण झाल्याचे मला जाणवले.
कोरोना झाल्याचे कळताच मानसिक खच्चीकरण होणार्या अनेकांची उदाहरणे पहाता आई-बाबांनी हा प्रसंग संयमाने हाताळला. ‘मुलींनी लगेच साहाय्याला यायला हवे’, अशी अपेक्षा त्यांच्या बोलण्यात नव्हती. पूर्वी बाबांना अशा प्रसंगात ताण यायचा; पण या वेळी ते पूर्ण स्थिर असल्याचे जाणवले.’
– सौ. कविता बेलसरे (मुलगी), पुणे (१९.५.२०२१)