अभिनेता कमाल खान यांच्यावर एका ‘मॉडेल’चा बलात्काराचा आरोप !
पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !
मुंबई – ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणात ताशा यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सामाजिक माध्यमांवर ताशा यांच्या ‘फिटनेस’ची नेहमी चर्चा असते. सध्या कमाल खान दुबई येथे आहेत. काही दिवसांपूर्वी गायक मिका सिंह यांनी कमाल खान यांच्यासाठी एक गाणे प्रदर्शित करून त्यात खान यांना ‘कुत्रा’ असे संबोधले होते. त्यानंतर कमाल खान यांनी मिका यांच्या विरोधात एक गाणे प्रदर्शित केले होते.