चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना !

नवी मुंबई – कोकण किनारपट्टीवरील जलप्रलयामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून विविध ठिकाणांहून साहाय्याचा ओघ चालू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे ४३ जणांच्या मदतकार्य पथकाने महाडमध्ये साहाय्य करण्यास प्रारंभ केला. हे पथक आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य यांसह २५ जुलै या दिवशी चिपळूण येथे पाठवण्यात आले आहे. डॉ. प्रशांत अहेर, डॉ. पंकज तितार, डॉ. उज्ज्वल नाईक या वैद्यकीय अधिकार्‍यांसह १२ जणांचा पथकात समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २५ जुलै या दिवशी स्वच्छता निरीक्षक विजय पडघन यांच्यासह २० स्वयंसेवकांचे आणखी एक मदतकार्य पथक आवश्यक साधनसामुग्रीसह महाड येथे पाठवले आहे.