भाजपच्या वतीने खंडोजीबाबा चौकात (पुणे) जोडे मारा आंदोलन !
आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक !
पुणे – मदतीची याचना करणार्या चिपळूण येथील पूरग्रस्त महिलेला अरेरावीची भाषा वापरल्याने आमदार भास्कर जाधव यांचा निषेध करण्यासाठी पुणे शहर भाजपने डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकात जोडे मारो आंदोलन केले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जाधव यांनी केलेले वर्तन सत्तेची धुंदी आणि गुंडगिरीचे प्रदर्शन करणारे आहे. नागरिक सरकारकडे मायबाप या नात्याने मदतीची विनंती करत असतांना त्यांची कुचेष्टा करणे ही गंभीर बाब असल्याने या कृत्याचा आम्ही जोडे मारून निषेध केला, असे मुळीक यांनी सांगितले. या आंदोलनाला शहर सरचिटणीस यांच्यासह अनेक पदाधिकारी, युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच विविध आघाड्यांचे आणि मतदारसंघांचे अध्यक्ष उपस्थित होते.