उद्योगपती राज कुंद्रा यांची सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकांतील खाती गोठवली !
कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई – अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या व्यवसायाप्रकरणी अटकेत असणारे उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर गुन्हे शाखेने कारवाई करत त्यांची सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकांतील खाती गोठवली आहेत. कोटक महिंद्रा या बँकेमध्ये १ कोटी १३ लाख रुपये इतकी रक्कम जमा होती. राज कुंद्रा यांना ॲपल आस्थापनाकडून १ कोटी ६४ लाख रुपये मिळाले आहेत, तर गूगलकडून त्यांना देण्यात आलेल्या पैशांविषयीची माहिती अजून समोर आलेली नाही.
राज कुंद्रा यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर या प्रकरणी अटकेत असलेले राज कुंद्रा यांचे सहकारी रायन थॉर्प यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.