हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देऊ नये ! – कर्नाटक शासनाचा आदेश
कर्नाटकातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असा आदेश प्रत्येक राज्यशासनाने काढला पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत !
बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु धर्मादाय विभाग आणि मंदिरे यांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देण्यात येऊ नये, असा आदेश राज्यशासनाकडून काढण्यात आला आहे. राज्यातील ७५७ प्रार्थनास्थळांना आणि वार्षिक साहाय्य घेत असलेल्या १११ प्रार्थनास्थळांना शासन मंदिरे आणि धर्मादाय विभाग यांच्या माध्यमांतून देत असलेल्या अनुदानावर निर्बंध घालण्यात आले असल्याचे या आदेशात म्हटले आहे.