आय.एम्.ए.चे धर्मांध ख्रिस्ती अध्यक्ष जयलाल यांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !
कोरोनावरील उपचाराचे श्रेय येशू आणि ख्रिस्ती धर्म यांना देण्याचे प्रकरण
नवी देहली – कोणत्याही धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या व्यासपिठाचा वापर करू नये, अशा प्रकारचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) प्रमुख जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांना दिला होता. त्या विरोधात जयलाल यांनी देहली उच्च न्यायालयात आव्हान याचिका प्रविष्ट केली होती.
Delhi HC Dismisses IMA Chief Dr Johnrose Austin Jayalal’s Appeal against Trial Court Order asking him to Not Use Organisation’s Platform to Propagate any Religion pic.twitter.com/mqDGPtES8X
— Megh Updates 🚨 (@MeghUpdates) July 27, 2021
ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने ‘भारताच्या राज्यघटनेच्या सिद्धांताच्या विरोधात कोणत्याही कृतींमध्ये सहभागी होऊ नये आणि पदाचा मान राखावा’, असे या वेळी म्हटले. काही मासांपूर्वी जयलाल यांनी कोरोनावरील अॅलोपॅथी उपचाराचा झालेल्या चांगल्या परिणामाचे श्रेय येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म यांना दिले होते. यावरून त्यांच्या विरोधात रोहित झा नावाच्या व्यक्तीने देहलीतील कनिष्ठ न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.