पुणे येथील हॉटेल क्लब २४ मध्ये अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेची कारवाई, ३५ सहस्रांचा माल जप्त !
पुणे, २७ जुलै – कोंढवा येथील दोराबजी महंमदवाडी रस्ता येथे हॉटेल क्लब २४ मध्ये अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने २५ जुलै या दिवशी धाड टाकून हुक्का पार्लर सील केले आहे, तसेच ४ चिलीम आणि इतर साहित्य असा एकूण ३५ सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हॉटेलचो मालक अमर लटुरे आणि हॉटेल मॅनेजर विक्रम जाधव यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.