मागील वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नगण्य घट !
गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद आतापर्यंत देशातून नष्ट होणे अपेक्षित असतांना त्यात प्रतिवर्षी नगण्य घट होणे आतापयर्र्ंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच आहे !
नवी देहली – मागील वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात आणि त्यात ठार झालेल्यांच्या संख्येत अल्प प्रमाणात घट झाली आहे. वर्ष २०२० मध्ये नक्षलवाद्यांनी ६६५, तर वर्ष २०१९ मध्ये ६७० आक्रमणे केली. वर्ष २०२० मध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १८३ जण, वर्ष २०१९ मध्ये २०२, तर वर्ष २०१८ मध्ये २४० जण ठार झाले. यावर्षी म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत नक्षलवाद्यांनी २४ वेळा उद्योगांवर आक्रमणे केली. तसेच छत्तीसगडमधील आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २२ सैनिक हुतात्मा झाले. या वेळी ५ नक्षलवादीही ठार झाले होते.