परात्पर गुरुदेवांचा आदर्श समोर ठेवून ईश्वरी कार्यात सहभागी व्हा ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
नाशिक – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आदर्श आपण सर्वांनी समोर ठेवायला हवा आणि ईश्वरी कार्यात सहभागी व्हायला हवे. त्यांनी प्रत्येक कृती आणि सेवा यांतून आपल्याला शिकवले आहे. त्यांनी आपल्याला अष्टांग साधनाही शिकवली आहे. विविध विषयांवर ग्रंथसंपदा निर्माण करून त्यांनी ज्ञानशक्ती दिली. ते ज्ञानगुरु, विश्वगुरु आणि जगद्गुरु आहेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या कु. पूजा काळुंगे यांनी केले. व्याख्यानाच्या प्रारंभी शौर्यजागृती अभियानाचा व्हिडिओ दाखवण्यात आला.
धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत !
१. साक्षी पवार – परात्पर गुरुदेवांचे कार्य ऐकून असे वाटले की, त्यांच्याविषयी शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली तरी अल्प आहे. (या वेळी सांगतांना साक्षी यांना भावाश्रू आले.)
२. सुमित – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात मी जोडलो गेलो, याविषयी कृतज्ञता वाटते. असे कार्य कुठेच बघायला मिळत नाही.