साक्षात् जगन्नाथाने पसरले हात ।
‘१.५.२०२० या दिवशी ध्यानमंदिराची स्वच्छता असल्याने तेथील सर्व देवतांच्या मूर्ती आणि चित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कक्षात ठेवण्यात आली होती. तेथेच आम्ही सेवेसाठी बसलो होतो आणि आमच्या समोरच जगन्नाथाची मूर्ती होती. त्याचे रूप पाहून आपोआप माझ्या मनात भरभर पुढील ओळी स्फुरल्या.
साक्षात् जगन्नाथाने पसरले हात ।
घेण्या आपल्याला त्याच्या कवेत, म्हणे तो भगवंत ।। १ ।।
भवसागर पार करण्या, बसा माझ्या नावेत ।
या पण येतांना, भक्तीभाव घेऊन या अंतरात ।। २ ।।
गुरूंच्या कृपेची आहे तुम्हा साथ ।
अवघड नाही लेकरांनो, ही मोक्षाची वाट ।। ३ ।।
प्रयत्नांना करता गतीने सुरुवात ।
साक्षात् जगन्नाथाने पसरले हात ।। ४ ।।’
– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |