मुंबईतील भाजपचे नगरसेवक एका मासाचे वेतन पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी देणार !
मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक त्यांच्या एका मासाचे वेतन पूरग्रस्तांना साहाय्यासाठी देणार आहेत. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एका मासाचे वेतन पूरग्रस्त साहाय्यनिधीत वर्ग करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.