संभाजीनगर येथे अपघातातील घायाळ कंटेनर चालकाला सोडून नागरिकांनी पळवल्या मद्याच्या पेट्या !
माणुसकीशून्य आणि स्वार्थी समाज हे धर्मशिक्षणाच्या अभावाचेच फलित !
संभाजीनगर – वैजापूर तालुक्यात मद्य घेऊन जाणार्या कंटेनरला २५ जुलैच्या रात्री अपघात झाला. पोलीस घटनास्थळी पोचण्यापूर्वीच जमावाने मद्याच्या १ सहस्र ६५० पेट्या पळवल्या. कंटनेरमध्ये एकूण १ सहस्र ८०० मद्याच्या पेट्या होत्या. या वेळी मद्याची पेटी पळवणार्या एकाही नागरिकाने कंटेनरच्या घायाळ चालकाकडे लक्ष दिले नाही; मात्र त्याच वेळी तेथून जाणार्या काही प्रवाशांनी घायाळ कंटेनर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करून अपघाताची माहिती पोलिसांना दिली.